शेतकऱ्यांकडून महावितरणाला आंदोलनाद्वारे झटका

आमच्याच हाता काही नाही तर कोठून देणार?
आमचे ऊस जाऊन दोन महिने झालेत मात्र, अद्याप उसाचे बिल जमा झालेली नाहीत आमच्याच हातात नाही, तर आम्ही कोठून देणार. कमीत कमी एक महिना आधी जरी सूचना दिली असती तर कमीत कमी निम्मी अर्धी रक्कम भरता आली असती पण अचानक वीज खंडित केल्याने आमच्या समोर दुसरा पर्याय उरला नाही, असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

शेती पंपांची वीज खंडीत केल्याने भादलवाडीत पुणे-सोलापूर महामार्ग रोखला

भिगवण – येथील महावितरण कंपनीने अचानक शेती पंपाची वीज खंडित केल्याने संतप्त झालेल्या भादलवाडी, डाळज, पोंधवडी, कुंभारगाव या गावातील शेतकऱ्यांनी आज (बुधवारी) भादलवाडी येथे पुणे-सोलापूर महामार्ग अर्धा तास रोखून धरला. उजनी धरणात पाणीसाठा भरपूर आहे, पण वीज वितरण कंपनीने दोन दिवसांपूर्वी कोणतीही सूचना न देता अचानक रात्री वीज शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केला. आधी वीज पुरवठा कंपनीने बंद केला व नंतर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना स्पीकरवरून सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे या भागातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, महावितरणाने अचानक सर्वच वीज पुरवठा खंडित केलेने वाड्या-वस्त्यांवरील सिंगल फेजवर चालणारी वीज ही बंद झाल्याने वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे विजे अभावी मोठे हाल सुरू आहेत.

आजच्या या रास्तारोको आंदोलनात माजी संसद मंत्री हर्षवर्धन पाटील अचानक सामील झाले त्यावेळी त्यांनी महावीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी इरवाडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या व निम्मे अर्धे पैसे भरून घेऊन आजच वीज पुरवठा सुरू करा अशी विनंती केली, त्यानुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविल्यामुळे रास्तारोको मागे घेण्यात आला.

याप्रसंगी माजी सभापती रमेश जाधव, बिट्टु कुताळ, कुंडलिक धुमाळ, तानाजी जगताप, प्रदीप जगताप, संजय जगताप, शिवाजी कन्हेरकर, अशोक भंडलकर, पोपट जगताप यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक निळकंठ राठोड व त्यांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती,तसेच पुणे सोलापूर महामार्गाचे सहाय्यक निरीक्षक अभंग व त्यांची सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते त्याच बरोबर वीज वितरण कंपनीचे अधिकारी चांगण व सर्व वायरमन हि उपस्थित होते.

आमच्याच हाता काही नाही तर कोठून देणार?
आमचे ऊस जाऊन दोन महिने झालेत मात्र, अद्याप उसाचे बिल जमा झालेली नाहीत आमच्याच हातात नाही, तर आम्ही कोठून देणार. कमीत कमी एक महिना आधी जरी सूचना दिली असती तर कमीत कमी निम्मी अर्धी रक्कम भरता आली असती पण अचानक वीज खंडित केल्याने आमच्या समोर दुसरा पर्याय उरला नाही, असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

महामार्ग दुतर्फा “ब्लॉक’
या रास्तारोकोवेळी जवळपास आर्धा तास पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला होता यामुळे महामार्गाचे दोनी बाजूनी एक किमीची वहानाच्या रांगा लागल्याने प्रवशांचे मोठे हाल झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)