शेतकऱ्यांकडून तोलाई बंद होणार

निलकंठ मोहिते

रेडा- इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजनकाटे असलेल्या बाजार समित्यांमध्ये आता प्रचलित तोलाई पद्धतीवर टाच येणार आहे. ज्या बाजार समित्यांच्या आवारात इलेक्‍ट्रॉनिक काटे बसविण्यात आले आहेत. अशा ठिकाणी शेतमालाचे वजन होत असेल तेथे. कुठलेही प्रकारची तोलाई न करण्याबद्दल व त्याची कपात शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या देयकातून वसूल न करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. 2014 पासून या आदेशात असलेली स्थगिती आता पूर्णपणे उठली आहे. नवीन अध्यादेश काढण्यात आलेला आहे.शासनाच्या या निर्णयामुळे तोलाईपोटी आर्थिक भुर्दंड बसणाऱ्या या शेतकऱ्यांना आता त्रासातून सुटका होणार आहे. मात्र, तोलाईवर उपजीविका असलेल्या बाजार समित्यामधील तोलाईदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोळसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये माथाडी कामगाराप्रमाणे तोलारदार हा घटक मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोजमाप करून देण्याचे महत्त्वाचे काम हे तोलारदार यांचे असते. त्यापोटी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत असतो. याच आर्थिक मोबदल्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. परंतु आत्ता राज्यातील बाजार समित्यांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स काटे बसवले असल्याने या घटकाला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तोलाईदारांची संख्या नगण्य असल्याने शेतकऱ्यालाच आपला माल स्वतःच मोजावा लागतो. तरीदेखील तोलाईची रक्‍कम खिशातून द्यावीच लागते. खऱ्या अर्थाने काम केले नाही तरी देखील याचा अर्थिक परतावा तोलाईदारांना कशासाठी द्यायचा, असाच प्रश्न शेतकरी शासन दरबारी विचारत होते. त्यामुळे 2014 साली तत्कालीन पणन संचालकांनी, शेतकऱ्यांचा शेतमाल तोलाईपोटी आत्ता शेतकऱ्यांकडून कोणतेच तोलाईपोटी शुल्क आकारण्यात येणार नाही, असा आदेशच काढण्यात आला होता.

  • तकऱ्यांचे लाखो रुपये वाचणार
    शासनाने काढलेल्या आदेशानुसार तोलाईपोटी शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे लाखो रुपये वाचणार आहेत. राज्यात एकूण 305 बाजार समित्या आहेत. व 603 उपबाजार समिती आहेत. यातील 146 बाजार समित्या या वर्गात मोडतात. 37 “क’ वर्गात मोडतात. 48 बाजार समित्या या “ड’ वर्गात आहेत. यामध्ये “अ’ “ब’ “क’ वर्गात असणाऱ्या बाजार समित्यांना इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीचे काटे बसवण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये जाणारे वाचणार आहेत.
  • लवकरच अंमलबजावणी
    शेतकऱ्यांची तोलाई वसूल न करण्याचा शासनाच्या आदेशावर लवकरच अंमलबजावणी केली जाईल. तोलाई कोणाकडून व कशी करायचीय, हे मात्र बाजार समित्या ठरवतील. शेतकऱ्यांकडून तोलाईपोटी जमा करणाऱ्या बाजार समित्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी संस्थेचे उपनिबंधक आनंद कटके यांनी दिली.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)