शेतकरी संघटनेने शिकवला मॉल कर्मचाऱ्यांना धडा

मंचर -मंचर जवळील एका तरकारी खरेदी करणाऱ्या मॉल कर्मचाऱ्यांची दादागिरी शेतकरी संघटनेच्या दणक्‍यामुळे संपुष्टात आली. शेतकरी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेऊन शेतकऱ्यांनी आणलेली कलिंगडे खरेदी करणे मॉल कर्मचाऱ्यांना भाग पाडले. हा प्रकार मंचर-चांडोली रस्त्यावरील एका राष्ट्रीय स्तरावरील उद्योगपतीच्या मॉलमध्ये गुरूवारी (दि. 29) दुपारी घडला.

शिंगवे येथील शेतकरी सुनील निवृत्ती वाव्हळ यांनी सुमारे 19 गुंठ्यांत कलिंगडा बरोबरच मिरचीचे आंतरपिक घेतले आहे. कलिंगड शेताजवळून मंचर येथील मॉलचे कर्मचारी दुचाकीवरून जात असताना त्यांना कलिंगडाचे बहारदार पिक दिसले.त्यांनी शेतकरी वाव्हळ यांना 7 रूपये किलोप्रमाणे 4 टन कलिंगडे खरेदी करण्याची हमी दिली. कलिंगडे मॉलमध्ये आणून दिल्यास आम्ही खरेदी करू, असे आश्‍वासन दिले.

तसेच दोन किलो वजनाच्या पुढील कलिंगडे खरेदी करण्याचे ठरले. 7 रूपये किलो हा बाजार फार कमी आहे. परंतु बाजारभाव मंदीमुळे कलिंगडांना उठाव नसल्याने सुनील वाव्हळ यांनी मनावर दगड ठेऊन 4 टन कलिंगड देण्याचे ठरविले. त्यानुसार गुरूवारी दुपारी टेम्पोमधून कलिंगडे घेऊन मॉलच्या तेथे ते आले. त्यावेळी मॉल कर्मचाऱ्यांनी मोठी-मोठी कलिंगडे निवडून वजन करून मॉलमध्ये घेतली. मात्र सुमारे 3 टन कलिंगडे उतरवल्यावर उर्वरित 1 टन कलिंगड नको असे म्हटल्यामुळे वाव्हळ एकदम गडबडले. संबंधित शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. 1 टन कलिंगड का नको, अशी विचारणा केली. त्यावेळी तुम्हाला तीन किलोच्या पुढील कलिंगडे खरेदी करणार असे सांगितल्याचे मॉल कर्मचाऱ्यांनी दिलेले उत्तर ऐकून वाव्हळ हबकले. अहो दोन किलो वजनाच्या पुढील कलिंगडे घेऊ असे सांगितले. परंतु जो ऑर्डर देणारा मॉल कर्मचारी होता त्याचा मोबाईल स्वीच ऑफ आहे. मालाची साईज कमी असल्याने आम्ही 1 टन कलिंगडे घेणार नाही, असा पवित्रा मॉल कर्मचाऱ्यांनी घेतला. तसेच तुमचा टेम्पो बाजूला काढा, नाहीतर आम्ही ओढून काढू, अशी अरेरावीची भाषा वापरल्याने वाव्हळ हे घाबरले. यावेळी वाव्हळ यांनी प्रसंगावधान राखत शेतकरी कृती समितीचे प्रभाकर बांगर यांना मोबाईलद्वारे संपर्क करून संबंधित मनमानीची माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)