शेतकरी संघटनेची साताऱ्यात ऊस परिषद

सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) – शेतकरी संघटनेच्यावतीने रविवार, दि. 14 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 2 वाजता संस्कृती मंगल कार्यालय, क्षेत्र माहुली येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

परिषदेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट, शिवाजीनाना नांदखिले, बाळासाहेब पठारे, वंदनाताई माळी आदी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ऊसाला पहिली उचल प्रतिटन साडेतीन हजार रुपये मिळाली पाहिजे, भूजल अधिनियमाच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची मुक्तता झाली पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व वीजबिल माफ केले पाहिजे, संपूर्ण शासकीय पाणीपट्टी माफ झाली पाहिजे आदी. मागण्यांवर ठराव करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)