कारखानदारांनी अद्याप एफआरपीबाबत कोणतीच भूमिका नाही
पुणे,दि.28 (प्रतिनिधी)-साखर कारखाने सुरु झाले तरी कारखानदारांनी अद्याप एफआरपीबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्यान शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे.साखर कारखान्याच्या संचालकांनी तातडीने याबाबतचे पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी केली आहे.
गतवर्षी कारखानदारांनी एफआरपी जाहीर करुनही उस दर अद्याप दिला नाही.त्याबाबत सध्या साखर आयुक्तालयाकडे सुनावणी सुरु आह.त्याचबरोबर आता नव्याने सुरु झालेल्या गाळप हंगामात सुद्धा तशीच परिस्थिती दिसून आहे.गाळप हंगाम सुरु होऊन आता दिड महिना झाला तरी अद्याप एफआरपीबाबत कुठलीही भुमिका कारखान्यांनी घेतलेली दिसत नाही.पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी ठरल्याप्रमाणे तो दिला आहे पण अनेक कारखान्यांनी अद्याप याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही.त्यामुळेच नक्की एफआरपीचे पैसे कसे मिळणार ते एकरकमी देणार की टप्याटप्याने देणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये सभ्रमाव्यस्था आहे.विशेष करुन राज्यातील मराठवाडा पट्ट्यातील कारखान्यांची हीच परिस्थिती आहे.त्यामुळे आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहे.ज्या कारखान्यांनी अद्याप एफआरपी बाबत काहीच निर्णय घेतलेला नाही अशा कारखान्यांसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यातून दोन दिवसापुर्वी सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुन चार दिवसात कारखान्यांनी लेखी हमी पत्र द्यावे असे आदेश दिली.
याच धर्तीवर शेतकरी संघटना आता इतर जिल्ह्यात ही अशाच प्रकारे आंदोलन करणार आहे.यंदा एफआरपी ही दोन ते तीन टप्यात देण्याबाबत विचार सुुरु आहे पण शेतकऱ्यांनी त्याला सुद्धा विरोध केला आहे.एफआरपीचे पैसे हे एकरकमी मिळाले पाहिजे अशी मागणी सुद्धा केली आहे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा