शेतकरी महिलांनी दिली खासदार सुळेंना भाजी भेट

परिंचे- तुम्ही पिकवलेला भाजीपाला छान आहे, दिवसभर कष्ट करता पण या शेतमालाला बाजारभाव मिळतोय का? सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे, तुम्ही आता सरकारला जाब विचारावा. मी संसदेत तुमचे प्रश्न मांडते. असा संवाद बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी (कांबळवाडी, ता. पुरंदर) येथील शेतकरी महिलांशी गावभेट दौऱ्यादरम्यान साधला. यावेळी गावातील महिलांनी त्यांच्या शेतातील भाजीपाला खासदार सुळे यांना भेट दिला.
यावेळी जालिंदर कामठे, माणिक झेंडे पाटील, बबू माहुरकर, सुदाम इंगळे, गौरी कुंजीर, निखील घाडगे, रंजना काळभोर, उर्मिला काळभोर, वनिता काळभोर, माधुरी काळभोर, शोभा काळभोर उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी शेतात कोणती पिके घेतली जातात याची चौकशी केली. कोबी, काकडी, घेवडा, मिरची, दोडका, टोमॅटो या भाजीपाला पिकांतुन किती उत्पन्न मिळते, महिला बचतगट आहेत का, दुधाला बाजारभाव मिळतो का याचीही विचारपुस केली. गावातील महिलांनी दिलेला भाजीपाला स्वीकारुन वेगळी भेट दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
कांबळवाडी हे अवघ्या तीस घरांचे गाव असून तेथील शेती व्यवसायावर गावची वार्षिक आर्थीक उलाढाल जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास असते. कांदा, टोमॅटो ही प्रमुख बागायती पिके असून येथील कांदा बेंगलोर, कर्नाटकला विक्रीसाठी जातो. गावातील सर्व महिला शेती करतात. तसेच अधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही शेतीमध्ये केला जात आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालनही केले जाते. अशी माहिती निखील घाडगे यांनी खासदार सुळे यांना दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)