शेतकरी, तरुण, महिला दु:खी- सिन्हा 

बडोदा  – सध्याचे केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. प्रत्येकजण दुःखी आहे, यामध्ये शेतकरी, तरुण, महिला आणि दलित समाजाचा समावेश आहे. सरकारकडून केवळ घोषणा दिल्या जात आहेत. त्यासाठी आगामी निवडणुकात या सरकारला पराभूत करावे अवे आवाहन माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केले आहे.

गुजरातमधील जुनागढ येथे शेतकरी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शेतकऱ्यांना संबोधित करताना सिन्हा म्हणाले, मोदींना जनतेने माफी देऊ नये, 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे सरकार उलथून टाकावे. मोदी सरकारने देशातील सर्व महत्त्वाच्या संस्थांची वाट लावली आहे. त्यामुळे आता वेळा आली आहे की, लोकांनी या संस्थांवर होत असलेल्या सर्जिकल स्ट्राइकविरोधात उभं रहायला हवे. तर सरकारने आरबीआयला देखील निर्देश दिले असतील तर गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिन्हा म्हणाले, मला तुमची माफी मागायची आहे. कारण, 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ज्यावेळी भाजपाकडून खोटी आश्वासने दिली जात होती त्यावेळी मी भाजपाचा सदस्य होतो. मात्र, आता या खोट्या आश्वासनांसाठी तुम्ही मोदींना माफ करु नये, त्यांना धडा शिकवावा असे मला वाटते. यावेळी खासदार शत्रूघ्न सिन्हा देखील सभेमध्ये सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)