शेतकरी कर्जमाफीला मुदतवाढ

पुणे, दि.31 – राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी 31 मार्च असलेली मुदत वाढवून 14 एप्रिल करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणखी चौदा दिवस मिळणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासानाने ही अभिनव योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी घेतला आहे. सुरुवातीला या योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत एक मार्च होती, ती वाढवून 31 मार्च करण्यात आली. आता परत वाढ करत 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. राज्यातील एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहता कामा नये, यासाठीच हा प्रयत्न केला जात असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर ज्यांनी दिड लाखांवरील कर्ज घेतली आहे.त्यांनी “वन टाईम सेंटलमेन्टसाठी दिलेली मुदत देखील वाढविण्यात आली आहे. ही मुदत आता 31 जूनपर्यंत राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)