शेतकरी आक्रमक झाले अन्‌ कालव्याला पाणी आले

राजगुरूनगर-चास कमान धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी चास कमान धरणाच्या राजगुरुनगर येथील कार्यालयापुढे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांची गरज आणि आक्रमकता पाहून सहाय्यक अभियंता एस. एम. शिंदे यांनी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाणी मिळण्यासाठी चास कमान धरणाच्या डाव्या कालव्यात तीन दिवसांपूर्वी आमदार सुरेश गोरे यांनी पाणी सोडले होते. त्यामुळे तालुक्‍यातील एका भागातील धरणाखालच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र दुसऱ्या भागून जाणाऱ्या धरणाच्या उजव्या कालव्याच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी न सोडल्याने या भागातील शेतकरी आक्रमक झाले. राजगुरुनगर येथील चास कमान धरणाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी थेट आज (दि. 5) धडक मोर्चा काढून आंदोलन केले. या आंदोलनात माजी पंचायत समिती समिती सदस्य कल्याण देखणे, शिरोलीच्या सरपंच संगीता केदारी, माजी सरपंच संजय सावंत, रवींद्र सावंत, संजय पवळे, चांडोलीचे उपसरपंच चिकू वाघमारे, अंबिका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तोबा सावंत, सहकारी संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बेंडाले, दत्ता वाळुंज, केरुभाऊ सावंत, विठ्ठल सांवत माऊली खरमाटे, माऊली सावंत, मारुती सावंत यांच्यासह दोंदे, संतोषनगर, खरपुडी, चांडोली, शिरोली, वडगाव पाटोळे आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्‍यात दुष्काळ पडला असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. चास कमान धरणातून डाव्या कालव्यात तालुक्‍यातील दुष्काळाची परिस्थती पाहून पाणी सोडण्यास सुरुवात केली. मात्र चांडोली, शिरोली, वडगाव पाटोळे भागातील शेतकरी वंचित राहिले त्यांना शेतीसाठी आणि पिण्यासासाठी धरणातून पाणी डाव्या कालव्यात सोडण्याची मागणी असताना अधिकारी व तालुक्‍यातील नेते त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज शेतकऱ्यांनी धडक आंदोलन केले. त्यांनी थेट राजगुरुनगर येथील चास कमान धरणाच्या सातकरस्थळ येथील कार्यालयावर मोर्चा नेला. तेथे अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या पथकाने घटनास्थळी येऊन शेतकरी आणि अधिकारी यांच्यात वाद विकोपाला गेला होता, त्यात संवाद घडवून आणला. सहायक अभियंता एस. एम. शिंदे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली.

  • चास कमान धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची गेली अनेक दिवसांपासून मागणी होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. तालुक्‍यातील दुष्काळ आणि शेतातील पिके जळून जाऊ लागल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. आम्ही थेट पाणी सोडण्यासाठी धरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. पोलीस अधिकारी आणि सहायक अभियंता ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली उजव्या कालव्यात पाणी सोडण्यातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी उचलली असून उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात सुरूवात झाली आहे.
    -संजय सावंत, माजी सरपंच
    -रवींद्र सावंत, शिरोली
  • उजव्या कालव्यात पाणी सोडताना अनेक अडचणी येतात. त्या शिरोली, दोंदे, संतोषनगर, खरपुडी, चांडोली, वडगाव पाटोळे ग्रामस्थांनी सोडविण्याची जबाबदारी घेतली आहे. जवळपास 15 दिवसांचे हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. आजपासून उजव्या कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
    -एस. एम. शिंदे, सहायक अभियंता चास कमान
    राजगुरूनगर ःचास कमान धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी चास कमान धरणाच्या राजगुरुनगर येथील कार्यालयावर आंदोलन केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)