शेणोली दरोड्याचा तीन दिवसात उलगडा

नागपुर येथून आरोपींना घेतले ताब्यात; जिल्हा पोलीस दलाची मोठी कारवाई

सातारा,दि.16 (प्रतिनिधी)

शेणोली, ता. कराड येथील महाराष्ट्र बॅंकेवर दिवसाढवळ्या दरोडा पडला होता. या दरोड्यात सुमारे 32 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. ही घटना घडल्यानंतर अवघ्या 3 दिवसात कराड तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून 17 लाख 10 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तपासात नागपूर क्राईम ब्रांच व मुंबई पोलिसांनी मदत केली असल्याची माहिती देतानाच अवघ्या तीन दिवसात आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कराड तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले.

दि. 11 मार्च रोजी शेणोली येथील महाराष्ट्र बॅंकेवर दरोडा पडला होता. या दरोड्यात सुमारे 32 लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या दरोड्याच्या तपासाबाबत अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एलसीबी टीमला तपासाच्या सूचना दिल्या होत्या घटना घडल्यानंतर कराड पोलिस व एलसीबीच्या टीमने तात्काळ हालचाली केल्या. मात्र, चोरटयांनी कोणताही पुरावा न सोडल्याने तपासाचे पोलिसांसमोर तपासाचे आवाहन होते. या तपासासाठी खबऱ्यांना मागावर लावले होते. यामधील एका खबऱ्याने रेकॉर्डवरील एका गुन्हेगाचा समावेश असल्याची खात्रीशीर माहिती कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांना दिली होती.

त्यानुसार पोलिसांची चार पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली होती. यामधील दोन पथकांनी सोलापूर जिल्ह्यात तपास करत असताना पारे, ता. सांगोला येथे छापा टाकून किरण शिवाजी गायकवाड (वय 24, रा. कडेगाव, जि. सांगली) व दत्तात्रय मधूकर जाधव (वय 24, रा. पारे, ता. सांगोला) यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेली 7 लाख 84 हजाराची रोकड, 2 लाख 3 हजार रूपये किंमतीच्या काडतुसासह पिस्टल जप्त केल्या.

यांच्याकडे या घटनेची चौकशी केली असता या घटनेतील आणखी दोन संशयित हे सोलापूर येथील खुराना ट्रॅव्हल्सच्या बसमधून नागपूर येथे पळून जात असल्याची माहिती मिळाली. ही खबर एलसबीच्या टीमने अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना दिली. या माहितीच्या आधारे त्यांनी नागपूर क्राईम ब्रांचच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याबातबची माहिती दिली. त्यानुसार संबधित बस नागपूरमध्ये आल्यानंतर नागपूर पोलिसांनी श्रवणकुमार ब्रीजनंदन प्रसाद यादव (वय 24) व अभिषेक कुमार रणजितसिंग (वय 20) दोघेही रा. दानापूर, जि. पटणा, बिहार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 लाख 31 हजार 200 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली.

तर दरोड्यातील पाचवा संशयित विकीराज संजय चौधरी (वय 22, रा. बेली रोड, पटणा सध रा. चेंबूर) हा मुंबईत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. हा संशयित पळून जायच्या आत त्याला ताब्यात घेण्यासाठी याबाबत चेंबूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिंसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मॅग्झीन व एक जिवंत काडतुस जप्त केले. या तपासात एकूण 14 लाख 4 हजार 300 रूपयांची रोकड, 90 हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने, 3 हजार 800 रूपयांची 19 जिवंत काडतुसे, 12 हजार 200 रूपयांची तीन मॅग्झीन व 1 जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार,सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कदम, प्रसन्न जऱ्हाड, सागर गवसने, अशोक भापकर, चंद्रकांत माळी,पोलीस नाईक मुबिन मुलाणी, शरद बेबले, प्रविण फडतरे, योगेश पोळ,राजू ननावरे, प्रविण कडव, विशाल पवार,विक्रम पिसाळ, वैभव सावंत, मयुर देशमुख, विजय सावंत, पृथ्वीराज घोरपडे, कांतीलाल नवघणे, विजय कांबळे यांच्यासह कराड तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

आजच्या तारखेला दरोडा या नावाने फोटो आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)