शेटफळ पाटील रस्ता मोजणीला विरोध

रेडा-संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या मोजणीला शेटफळ पाटी (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्या मोजणी अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले. रस्ताची सीमा अगोदर निश्‍चित करा व नंतरच रस्त्याची मोजणी करा असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
या मोजणीला विठ्ठलवाडी, रामवाडी, वडापुरी या परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवित अधिकाऱ्यांना माघारी पाठवले. यावेळी अमोल चंदनशिवे , संतोष देशमुख , विकास गायकवाड, नुरखान देशमुख, विलास जाधव, भारत कोरटकर, गणेश डाके, उमेश मेहेर, पप्पू भाळे, नामदेव रेडेकर, किसन सावंत-पाटील, पांडुरंग देवकर, रज्जाक मुलाणी, बबन फडतरे, शिवाजी शिंदे, राजेंद्र भाळे, सुरेश जाधव उपस्थित होते. महामार्गासाठी संपादित केलेल्या जमीनीची व रस्त्याची भूमी अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे सध्या शेतकरी दुविधा मनस्थितीत आहेत. भूसंपादनाची पूर्ण माहिती रस्त्याची रुंदी व प्रस्तावित रुंदी व मिळणाऱ्या मोबदला बद्दलची माहिती नाही, त्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या हरकत आहेत. त्याची सुनावणी न झाल्यामुळे मोजणीस विरोध असल्याचे निवेदन मोजणी भूमापक अधिकारी लवांडे यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)