शेखर सुमनकडून आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक

आलिया भट्ट ही नव्या पिढीतील एक छान आणि टॅलेंटेड अभिनेत्री असून तीने बॉलिवूडमध्ये आपली यशस्वी कारकीर्द घडवली असल्याचे अभिनेता शेखर सुमनने म्हटले आहे. अलिया ही हळूहळू आपल्या आपल्या सर्व क्षमतांसह बॉलिवूडमध्ये चांगल्या प्रकारे सेट होत असून तीचा लंबी रेस का घोडा म्हणून समावेश होत असल्याचे त्याने म्हटले आहे. शेखर सुमन यांनी रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आलियाचे अशाप्रकारे तोंडभरून कौतूक केले आहे. त्याचबरोबर शेखरने नव्या पिढीतला अभिनेता वरून धवनचेही कौतुक केले असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “बद्रीनाथ कि दुल्हनिया’ या सिनेमात वरून आणि आलिया यांच्या जोडीचे काम शेखरला कमालीचे आवडले असून त्यांच्या कामाचे त्याने कौतूक केले आहे. शशांक खेतान याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर बद्रीनाथ….च्या यशाबद्दल त्याने दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. शेखर सुमन सध्या संजय दत्तची कमबॅक फिल्म भूमीच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा वडिल आणि मुलीच्या नात्यावर बेतलेला आहे. आदिती राव हैदरी यात प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)