शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानने भागवली गोसावीवाडीकरांची तहान

बिजवडी : शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने गोसावीवाडी (बिजवडी) ता.माण येथील नागरीकांना पाणीपुरवठा करताना टॅंकर.

बिजवडी, दि. 13 (वार्ताहर) – बिजवडी, ता. माण येथील गोसावीवाडीचे रहिवाशी पाण्यासाठी दाहिदीशा वणवण करत होते. स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करूनही मिळत नसल्याने नागरीकांनी शेखर गोरेंच्या संपर्क कार्यालयात जावून ही समस्या सांगितली होती. त्यानंतर सौ. सुरेखा पखाले यांनी शेखर गोरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी
शेखरभाऊ गोरे यांनी प्रतिष्ठानच्यावतीने पाण्याचा टॅंकर गावात पाठवण्यात आला. दरम्यान, नियमित टॅंकरने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी बापूराव गोसावी, विकास गोसावी, तानाजी गोसावी, कैलास गोसावी, दिलीप गोसावी, अभिजीत गोसावी, सदाशिव गोसावी, हरिदास गोसावी, बाळकृष्ण गोसावी ,शिवाजी गायकवाड, रविंद्र गोसावी, दादा गोसावी, लाला गोसावी आदी नागरीक उपस्थित होते. यावेळी लोकांनी स्थानिक व तालुका प्रशासनाकडे गावाची समस्या सांगितली होती. परंतु, दखल घेतली नाही. शेवटी शेखर गोरे यांच्या कार्यालयाशी संपर्क केला. त्यांच्याकडे पाणी मागण्यासाठी प्रस्ताव करावा लागला नाही. पाण्याची अडचण आहे म्हणताच शेखर गोरेंनी तात्काळ पाण्याचा टॅंकर सुरू केला असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ बापूराव गोसावी यांनी व्यक्त केली.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)