शेखरभाऊंच्या ट्रॅकवर राष्ट्रवादीतील संधीसाधूंची बॅटिंग

संदीप घोरपडे : पक्षाने डावलले तरी माणची जनता पाठीशी

बिजवडी, दि. 7 (वार्ताहर) – माण-खटाव मतदार संघात मेलेल्या अवस्थेत गेलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला शेखर गोरे यांनी उर्जितावस्था दिली. परंतु, आज त्यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही संधीसाधू त्यांनी बनवलेल्या ट्रॅकवर आयती बॅटिंग करू पाहत आहेत. मात्र, माण-खटावची जनता शेखर गोरेंच्या पाठीशी उभी आहे. तारणहाराचेच पंख छाटणाऱ्यांनो, तुमचे असले उद्योग खपवून घेते जाणार नाहीत, असा इशारा संदीप घोरपडे यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात घोरपडे यांनी म्हटले आहे की, माण मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष दुहेरी खेळी खेळत आहे. पक्षाला उभारी देणाऱ्या शेखरभाऊ गोरेंना किंवा त्यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघाची जबाबदारी पेलणाऱ्या भगिनी सौ. सुरेखा पखाले यांना विश्वासात न घेता, कार्यक्रमांना निमंत्रित न करता जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येत आहेत. पक्षहित पाहणाऱ्या तारणहाराचेच पंख छाटण्याचे उद्योग पक्षात केले जात असले तर आम्ही ते खपवून घेणार नाही. शेखर गोरे हाच आमच पक्ष आहे. ते जो निर्णय घेतील त्या पाठीशी इथली जनता खंबीरपणे उभी राहणार आहे.
पक्षावर आलेल्या संकटावर मात करत पक्षाला उभारी देताना शेखर गोरे यांनी स्वत:वर अनेक संकट कोसळून घेतली. राजकीय गुन्हे दाखल झाले. मोका लागला. अशा स्थितीत पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. त्यांच्यावर प्रेम करणारी जनता मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. जनतेच्या आशीवार्दाने ते यातून सहिसलामत बाहेर पडले आहेत. पक्षावर वेळ आली तेव्हा शेखर गोरेंनी सर्वस्व पणाला लावले. परंतु, त्यांच्यावर वेळ आली तेव्हा पक्षाने मदत सोडा पण अडचणी वाढवण्याचे उद्योग केले. काहीजण शेखर येरवड्यात जाणार असे कुचेष्टेने बोलत होते. त्या सर्व आता तोंडावर पडले आहेत असल्याचे घोरपडे यांनी नमूद केले आहे.
मतदारसंघा बरोबरच जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यक्रमात साधे निमंत्रण देत नाहीत की बॅनरवर त्यांचा फोटो लावू शकत नाहीत. काय चूक केली आहे ते तर पक्षाने सांगावे. शेखर गोरेंच्या अनुपस्थितीत त्यांच्या भगिनी सौ. सुरेखाताई पखाले मतदारसंघातील जनतेच्या सुख:दुखात सामील होत रात्रंदिवस कार्य करत आहेत. त्यांनी जनतेला व पक्षाला व शेखरभाऊंची अनुपस्थिती कधीही जाणवू दिली नाही. त्यांनाही पक्षाने का डावलले आहे? माण विधानसभा मतदारसंघात शेखर गोरेंनी स्वकष्टातून तयार केलेल्या ट्रॅकवर मदतीची जाण नसणारे आयती बॅटिंग करत आहेत. शेखरभाऊ तुमचा शुन्यावर कधी त्रिफळा उडवतील ते समजणार नाही, असा टोला पत्रकात घोरपडे यांनी लगावला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)