शेकोट्यांची ऊब घेत रंग लागल्या गप्पा

खटाव परिसरात थंडीचा कडाका

खटाव – गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत चालला असून खटाव परिसरात पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत,या शेकोट्याची ऊब घेत परिसरातील आगामी ग्रामपंचायत निवडणुका तसेच विविध विषयांवर चर्चा होताना दिसत आहे.

-Ads-

सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळी व रात्री थंडी तर दिवसा ऊन पडत आहे. वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. रात्री नऊ नंतर रस्त्यावर शूकशूकाट जाणवत असून लोक थंडीमुळे घरातच थांबणे पसंत करू लागले आहेत.

थंडीपासून बचाव करण्यासाठी बाजारात उबदार कपडे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. हिवाळ्यातील थंडी बऱ्याच लोकांची आवडती व नावडती असली तरी पण गहू, हरभरा, शाळु (ज्वारी), वाटाणा या सारख्या पिकांच्या वाढीसाठी थंडी पोषक असतेच. मात्र, या थंडी बरोबर जर धूके पडले तर मात्र फळबागांबरोबरच इतर पिकांवर देखील रोगाचा प्रादूर्भाव होऊ शकतो, याची काळजी शेतकऱ्यांना आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)