शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले त्वरीत द्यावीत

संग्रहित फोटो

फलटणमधील शेकऱ्यांची मागणी

फलटण – सन 2017- 2018 या वर्षाच्या गळीत हंगामातील थकीत ऊस बिल रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. तरी त्वरीत थकीत बील रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

तालुक्‍यातील श्रीराम कारखाना वगळता न्यू फलटण शुगर वर्क्‍स साखरवाडी या कारखान्याने सन 2017-2018 या वर्षाच्या गळीत हंगामातील 15 नोव्हेंबरपासून मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या ऊसाचे बिल अद्याप 2650 रुपयांनी दिलेले नाही. हे थकीत ऊस बिल रक्कम शासन नियमानुसार 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे होते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच स्वराज ग्रो लिमिटेड शुगर वर्क्‍स या कारखान्याने जानेवारी ते मार्च या कालावधीमधील गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता ठरल्याप्रमाणे अद्याप दिला नाही. तो त्वरित द्यावा. शरयु ग्रो लिमिटेड शुगर वर्क्‍स या साखर कारखान्याने 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल 2350 रुपये प्रमाणे काढले आहे. ते 2650 रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. 2350 प्रमाणे होत असलेले बिल शेतकऱ्यांनानी मान्य नाही. वरील मागणीप्रमाणे थकीत रक्कम व फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)