शेकप्पा गाजूल लिखित “पैशाची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन

 

पुणे, दि. 25 – दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील मुस्ती येथील शिक्षक शेकप्पा गाजूल लिखित “पैशाची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवारी झाले. याप्रसंगी आयोजित गाजूल यांच्या जुनी नाणी व पोस्ट संग्रहाच्या प्रदर्शनास सोलापुरातील शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुळे सोलापूर येथील जामगुंडी मंगल कार्यालयात उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आदर्श शिक्षक पुरस्कार सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात “पैशाची गोष्ट’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. याप्रसंगी ज्ञानरचनावादी साहित्य प्रदर्शन व जुनी नाणी, पोस्ट संग्रहाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पैशाची गोष्ट या पुस्तकात हजारो वर्षापासून ते आतापर्यंतच्या चलनाच्या नाणी, कागदी नोटांचा इतिहास गोष्टीच्या स्वरुपात आणि सचित्रात गाजूल यांनी उलगडून दाखविले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उत्तर पंचायत समिती सभापती संध्याराणी पवार, उपसभापती रजनी भडकुंबे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गायकवाड, महादेश कमळे, धनेश अचलारे, गटशिक्षाधिकारी मल्हारी बनसोडे, गटविकास अधिकारी रंजना कांबळे, संदीप टेळे उपस्थित होते. जयश्री सुतार यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय चोपडे यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)