शेअर व्यवहारासाठी बायोमेट्रिक व्यवस्था?

नवी दिल्ली- मोबाइलवरून ऍपद्वारा शेअरचे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बाजार नियंत्रक सेबी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशा व्यवहारासाठी बोटाचे ठसे किंवा आय स्कॅन बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

सेबीने या विषयावर गुंतवणूकदार व ब्रोकर्सची मते मागितली आहेत. त्यांच्या सूचनांचा विचार करून या विषयावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे छोट्या ब्रोकर्सना अडचणी येण्याची शक्‍यता आहे. भारतासह अनेक देशात अनेक संस्थावर सायबर हल्ले झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)