शेअर बाजार निर्देशांकाची आगेकूच

मुंबई- जागतीक बाजारातून सकारात्मक संदेश येऊनही सकाळी शेअर बाजार निर्देशांकात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र नंतर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानंतर निर्देशांक वाढले. संध्याकाळी जून अखेरच्या तिमाहीसाठीची राष्ट्रीय उत्पन्नाची अकाडेवारी जाहीर होणार असल्यामुळे तिकडे लक्ष असलेल्या गुंतवणूकदारांनी जास्त खरेदी केली नाही. तरीही निर्देशांक कालच्या तुलनेत वरच्या पातळीवर बंद झाले.

बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 84 अंकानी वाढून 31730 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकानी वाढून 9917 अंकावर बंद झाला. आज रिऍल्टी, उर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, ग्राहक वस्तू आणि भांडवली वस्तू तयार करणाऱ्या कंपन्याच्या शेअरची खरेदी झाली.
30 ऑगस्टपर्यंत देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 15695 कोटी रूपयाच्या शेअरची खरेदी केली मात्र आताही कुंपनावर बसून असलेल्य परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 16073 कोटीरूपयाच्या शेअरची विक्री केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)