शेअर बाजारात निवडक खरेदी 

बॅंका तेजीत तर माहिती तंत्रज्ञान कंपन्या पिछाडीवर 

मुंबई: चार दिवसांपासून शेअरबाजारात झालेल्या एकतर्फी विक्रीमुळे शेअरबाजार निर्देशांक आता बऱ्याच खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे बऱ्याच कंपन्याचे शेअर कमी किमतीवर उपलब्ध झाले आहेत. याचा फायदा घेऊन काही गुंतवणूकदारांनी निवडक खरेदी केल्यामुळे निर्देशांकांत बुधवारी वाढ झाली. त्यातच आज रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाली आणि क्रुडचे दर थोडे कमी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजार बंद होताना बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 186 अंकानी वाढून 34033 अंकावर बंद झाला.

निर्देशांक 34 हजारांच्यावर गेल्यामुळे गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 77 अंकानी म्हणजे 0.89 टक्‍क्‍यांनी वाढून 10224 अंकावर बंद झाला. गेल्या चार दिवसांतील विक्रीमुळे सेन्सेक्‍स 1315 अंकानी कमी झाला होता.

एकीकडे बॅंका आणि वित्त संस्थाच्या शेअरची खरेदी झाली तर रुपया वधारल्याने माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि औषधी कंपन्यांना विक्रीला सामोरे जावे लागले. त्यामुळे निर्देशांकांत माफक वाढ झाली. रिझर्व्ह बॅंकेने भांडवल सुलभता निर्माण करणे मनावर घेतले असल्यामुळेही गुंतवणूकदार खरेदीच्या मानसिकतेत होते.

देशांतील संस्थागत गुंतवणूकदार संस्था निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 116 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 340 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. जागतिक बाजारात व्यापारयुद्धामुळे चढ-उतार सातत्याने होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)