शेअर निर्देशांकात 14 टक्‍क्‍यांची भक्‍कम वाढ 

मुंबई: चालू आर्थिक वर्षात आपापर्यंत म्हणजे एप्रील महिन्यापासून शेअर बाजार निर्देशांकात 14 टक्‍क्‍यापेक्षा अधिक वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्ल्यात तब्बल 12 लाख कोटी रुपयानी वाढ झाली आहे. सध्या चालू असलेला सप्टेंबर महिना वगळता आतापर्यंत प्रत्येक महिन्यात सेन्सेक्‍समध्ये वाढ झाली आहे.
29 मार्च पासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 4749 अंकादी म्हणजे 14.40 टक्‍क्‍यांनी वाढून आता 37717 अंकावर आहे. 29 ऑगस्ट राजी सेन्सेक्‍स 39 हजाराच्या जवळ म्हणजे 38989 अंकापर्यंत वाढला होता. मात्र त्यानंतर जागतिक परिस्थिती बिघडत चालल्यामुळे निर्देशांकात काही प्रमाणता घट झालेली दिसून येत आहे.
28 मार्च राजी शेअर बाजारावर नोंदलेल्या सर्व कंपन्याचे एकूर बाजार मूल्य 1201444 कोटी रुपये इतके होते. ते आता 15426441 कोटी रुपयावर गेले आहे. काल शेअर बाजार निर्देशांकात दाने दिवसानंतर चांगली वाढ झाली होता. मात्र आज धार्मीक कारणामुळे शेअर बाजाराना सुटी आहे. या काळात बरेच आंपीओ जारी केले गेले. त्याचबराबर हे आयपीओ जारी करणाऱ्या कंपन्याची शेअर बाजारावा नोंदणी करण्यात आली.
काल केंद्र सरकारने रुपयाचे मुल्य जास्त कमी होऊ दिले जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे काही प्रमाणात रुपयाच्या मूल्ल्यात सुधारणाही झाली. त्यानंतर काल निवडक खरेदी होऊन निर्देशांकात वाढ झाली. त्या अगोदर दोन दिवसांपासून निर्देशांक रुपयाच्या अवमूल्यनामुळे घसरले होते. काल ग्राहक वस्तू, धातू, भांडवली वस्तू क्षेत्रातील कंपन्याचे शेअर कमी भावादर उपलब्ध असल्यामुळे त्यांची खरेदी झाली.
काल रुपया 72.91 रुपये प्रती डॉलरपर्यंत कोसळल्यानंतर सरकारने हस्तक्षेपाची भाषा सुरू केली. पंतप्रधान कार्यालय या प्रकरणात लक्ष घालणार आहे. त्यानंतर रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाली. त्याचा सकारात्मक परिणाम निर्देशांकावर झाला. त्यातच भारताची ऑगस्ट महिन्यातील निर्यात वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स बुधवारी 304 अंकांनी म्हणजे 0.81 टक्‍क्‍यांनी वाढून 37717 अंकावर बंद झाला. तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 82 अंकांनी वाढून 11369 अंकावर बंद झाला. जागतिक व्यापार युद्धामुळे त्याअगोदर दोन दिवसात सेन्सेक्‍स 977 अंकावर बंद झाला. मात्र जागतिक बाजारात आजही नकारात्मक वातावरण कायम आहे. जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची भीती कायम आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)