शेअर निर्देशांकांसाठी आगामी काळही अस्थिरतेचा

मुंबई: देशातील आणि जगातील अनेक घटनाक्रमामुळे सरलेल्या आठवड्यात शेअर बाजारात बरीच अनिश्‍चितता होती. आठवड्याच्या सुरूवातीला निर्देशांकानी सपाटून मार खाल्ल्यानंतर अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. तरीही आठवड्याच्या पातळीवर निर्देशांक कमी झाले. गेल्या दोन आठवड्यापासून निर्देशांक कमी होत आहेत.
आठवड्याच्या सुरुवातीला रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत होते. त्याचबरोबर क्रुडचे दर वाढत चालले होते. त्यातच

अमेरिका आणि चीन व इराणदरम्यानचे मतभेद वाढत चालले आहेत. या कारणामुळे जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या काही दिवसात निर्देशांकांत मोठ्या प्रमाणात घट झाली. दरम्यानच्या काळात सरकारने महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर केली. त्याचबरोबर औद्योगिक उत्पादन वाढल्याची आकडेवारीही जाहीर करण्यात आली. मात्र तरीही निर्देशांक घसरण होत होती. त्यानंतर सरकारने या घडामोडीचा आढावा घेण्याची घोषणा केली. त्याचबरोबर क्रुडचे दर कमी झाल्यामुळे रुपया सावरल्याने आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मात्र बाजारात बऱ्यापैकी खरेदी होऊन काही प्रमाणात झिज भरून निघण्यास मदत झाली. तरीही आठवड्याच्या पातळीवर निर्देशांक कमी झाले.

आठवड्याच्या शेवटी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 299 अंकानी कमी होऊन 38090 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 73 अंकांनी कमी होऊन 11515 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले. या अगोदरच्या आठवड्यात सेन्सेक्‍स 255 अंकानी कमी झाला होता.

आठवड्याच्या शेवटी पंतप्रधान कार्यालयाने अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला आणि काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सरकार परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काही सवलती जाहीर करणार आहे.
त्याचबरोबर आयात कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. महागाई वाढू दिली जाणार नाही. चालू खात्यावरील तूट वाढणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर वित्तीय तूटही 3.3 टक्‍क्‍यांच्या आता रोखण्याचे सरकारने ठरविले आहे.

याचा पुढील आठवड्यात रुपयाच्या मूल्यावर काय परिणाम होतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. मात्र गेल्या आठवड्यात चीनच्या सर्वच्या सर्व वस्तूंवर आयात शुल्क लावण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर इराणकडून जो कोणी तेल घेईल त्याच्यावर निर्बंध लादण्याचे अमेरिकेने ठरविले आहे. भारतही मोठ्या प्रमाणात इराणकडून तेल घेतो. भारताला यातून सूट दिली जाणार नसल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. याचा भारतावर आणि जागतिक क्रुड बाजारावरही परिणाम होणार आहे. सरलेल्या आठवड्यात देशातील व परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2343 कोटी रुपयांची विक्री केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)