शेअर निर्देशांकांत अल्प वाढ 

मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांचे शेअर तेजीत 

मुंबई; जागतिक बाजारात संदिग्ध वातावरण आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक चालू असल्यामुळे शेअरबाजारात खरेदी विक्रीच्या छोट्या मोठ्या लाटा येण्याचे वातावरण होते. शेवटी निर्देशांकात कालच्या तुलनेत अल्प वाढ नोंदली गेली.

बाजार बंद होताना शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 33 अंकांनी म्हणजे 0.09 टक्‍क्‍यांनी वाढून 35962 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 13 अंकांनी वाढून 10805 अंकांवर बंद झाला.
बिगर बॅंकिंग वित्त संस्थांना भांडवल पुरवठा, रिझर्व्ह बॅंकेकडील राखीव साठा या विषयावर बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक चालू आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तिकडे लक्ष आहे. तेलाचे दर आटोक्‍यात असल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर आज तेजीत होते. त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.

रुपया बऱ्यांपैकी स्थिरावत असल्याचे वातावरण असल्यामुळे काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 675 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 51 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या ज्या पद्धतीने दर आकारतात यावरून हे प्रकरण दूरसंचार लवादाकडे गेले होते. मोबाइल कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवादाने काही मोबाइल कंपन्यांना पूरक असा निर्णय दिला.

या घटनाक्रमांनंतर शेअर बाजारात एअरटेल, व्हाडोफोनसारख्या कंपन्यांचे शेअर उसळले. आता देशातील परिस्थिती स्थिर झाली आहे. त्यामुळे आगामी काळात निर्देशांक एक तर स्थिर राहतील किंवा वाढण्याची शक्‍यता असल्याचे काही ब्रोकर्सनी सांगितले. मात्र जागतिक परिस्थिती अस्थिर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)