शेअर निर्देशांकांचे कोसळणे चालूच 

मुंबई: रुपयाचे कोसळणे चालूच आहे. त्याचबरोबर क्रुडचे दर वाढत आहेत. या दोन बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक आहेत. त्यामुळे परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेत असल्याचे वातावरण बाजारात आहे. परिणामी आज पाचव्या दिवशीही शेअरबाजारात निर्देशांकांची घसरण नोंदली गेली. क्रुडचे दर आज 78 डॉलर प्रति पिंपावर गेले. त्यामुळे भारताच्या आयातीचा खर्च वाढून चालू खात्यावरील तूट आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर येत आहे.
बाजार बंद होताना मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 154 अंकानी कमी होऊन 38157 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 62 अंकांनी कमी होऊन 11520 अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रात सेन्सेक्‍स 584 अंकांनी कमी झाला आहे. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून विक्री होत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यातील मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची ऑगस्ट महिन्यातील उत्पादकता 51.7 टक्‍के इतकी मोजली गेली आहे. जी की जुलै महिन्यात 52.3 टक्‍के इतकी होती. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य आज पुन्हा 37 पैशानी कोसळून प्रति डॉलरला 71.58 रुपये या नीचांकावर गेले. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच देशातील गुंतवणूकदारानी विक्री केल्याचे वातावरण होते.
कालच्या व्यवहाराबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 21 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. त्याचबरोबर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनीही काल तब्बल 542 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. या पडत्या काळातही आयटी कंपन्या तेजीत होत्या. कारण त्याचा रुपयाचे अवमूल्यन झाल्यास फायदा होतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)