शेअरिंग सायकलला वाढतोय प्रतिसाद

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असताना महापालिकेने शहरातील काही भागात प्रायोगिक तत्त्वावर शेअरिंग सायकल योजना सुरु केली आहे. आता या योजनेला प्रतिसाद वाढत असून ही योजना नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे.

महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव येथे सायकल शेअरिंग सुविधा ऑगस्ट 2018 पासून सुरू केली आहे. सुरूवातीला महापालिकेने उभारलेल्या सायकल स्टॅण्डवर 50 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सायकलीसाठी पाच रुपये प्रति तास भाडे आकारण्यात येत आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महापालिका व वायईएलयु या खासगी कंपनीतर्फे ही सुविधा सुरू करण्यात आली.

शेअरिंग सायकलची सुविधा सुरूवातीला पिंपळे सौदागर येथील काही हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याला तितकासा प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यानंतर महापालिकेने काही सुधारणा करुन ही योजना स्मार्ट सिटी अंतर्गत पुन्हा सुरु केली. मागच्या पाच महिन्यांपासून सुरु करण्यात आलेल्या या योजनेला सध्या वाढता प्रतिसाद आहे. सुरुवातीला 50 सायकल असणाऱ्या सायकल स्टॅण्डवर आता 300 सायकल उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी अनेकजण शेअरींग सायकलचा पर्याय निवडत आहेत. शहराच्या उर्वरीत भागातही ही योजना सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शेअरिंग सायकल ही योजना महापालिकेने सुरु केली आहे. मात्र सध्या पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या दोनच ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, शहरातील इतर भागातही विशेषतः उपनगरांमध्ये या योजनेची सर्वाधिक गरज आहे. यामध्ये नागरिकांचा आणखी सहभाग वाढवण्यासाठी शेअरींग सायकल वापराचे फायदे आणि महत्त्व याबाबत महापालिकेने जनजागृती करणे गरजेचे आहे.
– शंतनु वायदांडे, युवक.

शेअरिंग सायकल ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव येथे राबवण्यात येत आहे. या दोन्ही भागात शेअरिंग सायकलचे 28 स्टेशन आहेत. या स्टेशनवर सध्या 300 सायकल उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुढील काळात विविध ठिकाणी स्टेशन उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यानुसार सायकलची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
– निळकंठ पोमण, प्रकल्प सहाय्यक संचालक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)