पहिल्या तिमाहीत विकासदर वाढूनही गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्री 
रुपयाचे मूल्य 21 पैशांनी कोसळून ऐतिहासिक नीचांकावर 
ऑगस्ट महिन्यात मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्र मंदावले 
मुंबई: रुपया कोसळण्याबरोबरच मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. त्याबरोबर जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यानंतर शेअरबाजारात सोमवारी दुपारी मोठ्या प्रमाणात विक्री होऊन शेअरबाजार
निर्देशांक कोसळले. शुक्रवारी सायंकाळी पहिल्या तिमाहीत राष्ट्रीय उत्पन्न 8.2 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे जाहीर झाले होते. त्यानंतर सकाळी बाजार सुरू होताना निर्देशांकांत बरीच वाढ झाली. मात्र, नंतर मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्याबरोबर रुपयाचे मूल्य कमी झाले. त्यामुळे जोरदार विक्री होऊन निर्देशांक कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 332 अंकांनी कमी होऊन 38312 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 98 अंकांनी कमी होऊन 11582 अंकांवर बंद झाला. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून विक्री होत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून सेन्सेक्‍स 251 अंकांनी कमी झाला आहे.
ऑगस्ट महिन्यातील मॅन्युफॅक्‍चरींज क्षेत्राच्या उत्पादकतेची आकडेवारी आज जाहीर झाली. त्यानुसार या क्षेत्राची ऑगस्ट महिन्यातील उत्पादकता 51.7 टक्‍के इतकी मोजली गेली आहे. जी की जुलै महिन्यात 52.3 टक्‍के इतकी होती. त्याचा गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य आज 21 पैशांनी कोसळून प्रति डॉलरला 71.21 रुपये या नीचांकावर गेले. त्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच देशातील गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे वातावरण होते.
विक्रीचा मारा एवढा जास्त होता की, मोठ्या कंपन्यांबरोबरच छोट्या कंपन्यांचे शेअर कोसळले. त्यामुळे या कंपन्यांच्या भावावर आधारित मिडकॅप 0.45 टक्‍क्‍यांनी तर स्मॉलकॅप 0.17 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)