शेअरबाजार घसरल्याने अब्जाधीशांसाठी काळ खराब

नवी दिल्ली- जगातील पहिल्या 500 श्रीमंतांना मागचे दोन महिने अत्यंत वाईट गेले आहेत. आर्थिक आघाडीवर त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. अमेरिकन शेअरबाजारातील घसरणीचा त्यांना जबर फटका बसला आहे. या आठवड्यात 500 श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये 181 अब्ज डॉलर्स घट झाली आहे.

स्टील आणि ऍल्युमिनियमवर आयात शुल्क लागू करण्याच्या निर्णयामुळे ट्रेड वॉर सुरू होण्याची भिती असल्याने अमेरिकी शेअर बाजाराने दोन वर्षातील नीचांकी पातळी गाठली आहे. या महाश्रीमंतांच्या संपत्तीत 26 जानेवारीपासून 436 अब्ज डॉलर म्हणजे 28,345 अब्ज रुपयांची घट झाली आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला असून त्याची संपत्ती 10.3 अब्ज डॉलर म्हणजे 670 अब्ज रुपयांनी कमी झाली आहे. केंब्रिज ऍनालिटिका प्रकरणाचा फटका फेसबुकला बसला आहे. 5 कोटी युजर्सचा डाटा परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुकच्या विश्‍वासार्हतेला तडा गेला आहे. फेसबुकच्या शेअरमध्ये 14 टक्‍क्‍यांची घट झाली आहे. इतराच्या संपत्तीतही मोठी घट झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)