शेअरबाजारावर चलन अस्थिरतेचे व व्यापारयुद्धाचे संकट कायम

मुंबई – स्थूल अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याची लक्षणे दिसत असल्यामुळे गेल्या सहा दिवसांत शेअरबाजारात जोरदार विक्री झाली होती. आजही रुपयाचे मूल्य सकाळी कोसळल्यानंतर शेअरबाजारात दुपारपर्यंत विक्रीचे वारे होते. मात्र नंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून काही गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे

निर्देशांकात बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र तरीही बाजारातील अस्थिरता कमी झालेली नाही. गेल्या आठवड्यात निर्देशंक मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे काही चांगल्या कंपन्याचे शेअर तुलनेने कमी किमतीवर उपलब्ध आहेत. त्या शेअरची आज खरेदी झाल्याचे दिसून आले.

बाजार बंद होताना गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 224 अंकानी वाढून 38242 अंकावर बंद झाला. गेल्या सहा दिवसांत सेन्सेक्‍स तब्बल 878 अंकानी कमी झाला आहे. आज राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 59 अंकांनी वाढून 11536 अंकांवर बंद झाला. सकाळी युरोपियन शेअरबाजारातून काही प्रमाणात सकारात्मक संदेश आल्यानंतर निर्देशांकांना थोडा आधार मिळाल्याचे दिसून आले. आज आरोग्य, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची त्यातल्या त्यात जास्त खरेदी झाली.

कालच्या कामकाजाबाबत मिळालेल्या माहीतीनुसार काल देशातील संथागत गुंतवणूकदारांनी 176 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 383 कोटी रुपयाच्या शेअरी विक्री केली. आगामी काळात निर्देशांक अस्थिर राहील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)