शेअरबाजारात निवडक खरेदीसाठी आणखी वाव

नवी दिल्ली: सरलेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ होऊनही गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केल्याचे दिसून आले आता निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार साध राहण्याची शक्‍यता असली तरी निवडक खरेदीस वाव असल्याचे काही विश्‍लेषकांना वाटते.

त्यातल्या त्यात औषधी, उर्जा आणि सरकारी कंपन्याच्या शेअरच्या खरेदीकडे गुंतवणूकदार लक्ष देण्याची शक्‍यता आहे. सरलेल्या आठवड्यात बऱ्याच गुंतागुंतीच्या परिस्थितीतही शेअर बाजार निर्देशांक वाढले. गेल्या दोन आठवड्यापासून आठवड्याच्या पातळीवर निर्देशांक वाढत आहेत. या काळात जागतिक पातळीवर फक्त ब्राझीलचे निर्देशांक भारतापेक्षा जास्त वाढले आहेत. पतधोरणाच्या अगोदर निर्देशांकांता वाढ झाली. मात्र पतधोरणानंतर दोन दिवस निर्देशांक कमी झाले. शुक्रवारी बाजारात जोरदार खरेदी झाल्यामुळे आठवड्याच्या पातळीवर निर्देशांक वाढण्यास मदत झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी मुंबई शेअरबाजाराचा 
निर्देशांक सेन्सेक्‍स 391 अंकांनी तर निफ्टी 116 अंकानी वाढला. त्यामुळे सरलेल्या आठवड्यातही सेन्सेक्‍स 219 अंकानी म्हणे 0.59 टक्‍क्‍यांनी तर निफ्टी 82 अंकानी म्हणजे0.73 टक्‍क्‍यांनी वाढला. त्याचबरोबर या आठवड्यात मुंबई शेअरबाजाराचा मिड कॅप 1.85 टक्‍क्‍यानी तर स्मॉल कॅप 2.33 टक्‍क्‍यांनी वाढला. याचा अर्थबाजारात सकारात्मक वातावरण असल्याचे दिसून येते. सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढल्यानंतर बाजारातील नकारात्मक वातावरण निवळल्याचे दिसून आले. अमेरिका आणि जपानचे पतधोरण फारसे नकारात्मक नसल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. तरीही अमेरिका- चीनदरम्यनाचे व्यापारयुद्ध कोणते वळण घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. मोठ्या कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात या कंपन्यांची उत्पादकता वाढण्याची शक्‍यता खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री मंदावली असल्याचे दिसून येत आहे.

या आठवड्यात या गुंतवणूकदारांनी केवळ 75 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. रिझर्व्ह बॅंकेने जरी व्याजदरात वाढ केली असली तरी अमेरिकेने व्याजदरात कपात टाळल्यामुळे भारतीय शेअरबाजाराबरोबर जागतिक शेअरबाजारातील वातावरण खरेदीसाठी पूरक झाल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. भारतात गेल्या दोन महिन्यापासून पाऊस चांगला पडत आहे. उरलेल्या दोन महिन्यांतही पाउस चांगला पडणार असल्याचे वेधशाळेने सांगितले आहे. त्यामुळेही या आठवड्यात निर्देशांक वाढण्यास मदत झाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)