शेअरबाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा 

निर्देशांक “जैसे थे’ : दुपारच्या सत्रात नफेखोरी बळावली 
मुंबई: जागतिक बाजारात आज खरेदीचे वातावरण होते. त्यामुळे भारतीय शेअरबाजारातही सकाळी खरेदी झाली. मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे दुपारी बरीच विक्री झाल्याने निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिर राहिल्याचे दिसून आहे. मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.17 टक्‍क्‍यांनी म्हणजे 26 अंकानी कमी होऊन 37665 अंकावर बंद झाला. अगोदर सेन्सेक्‍स 37876 अंकापर्यंत वाढला होता. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी मात्र केवळ 2 अंकांनी वाढून 11389 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्या अगोदर निफ्टी 11428 अंकापर्यंत वाढला होता.
नफ्यासाठी गुंतवणूकदारांनी बॅंका आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री केली. गेल्या काही दिवसांतील तेजीमुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर जरा जास्त वाढले होते. मोठ्या कंपन्यांप्रमाणे छोट्या कंपन्यांच्या शेअरची बरीच विक्री झाल्यामुळे स्मॉल कॅप 0.22 टक्‍क्‍यांनी तर मिड कॅप 0.18 टक्‍क्‍यानी कमी झाला. या पडत्या काळतही धातू कंपन्याचे शेअर 1.27 टक्‍क्‍यापर्यंत वाढले. निर्देशांक सध्या विक्रमी पातळीवर असल्यामुळे गुंतवणुकदार कमालीचे सावध झाले असून, आगामी काळातही त्यांचे देशातील आणि परदेशातील परिस्थितीवर लक्ष राहण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले जाते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)