शेअरबाजारातील नफेखोरी थांबता थांबेना

ऊर्जा, धातू, नैसर्गिक वायू, बॅंका, वाहन, रिऍल्टीतील कंपन्यांच्या शेअरची विक्री

मुंबई: परवापासून चलनबाजारात रुपयाचे मुल्य वेगाने कमी होत असल्यामुळे शेअर बाजारात नफेखारी वाढू लागली आहे. त्यामुळे आजही शेअरबाजार निर्देशांक कमी झाले. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी तर दिली आहेच त्याचबरोबर चीनच्या वस्तूवर आणखी आयात शुल्क लावण्याची भाषा केली आहे. त्यामुळे जागतिक शेअरबाजारातील वातावरण अस्वस्थ होते. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. रुपया घसरत असल्यामुळे बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरवर दबाव येत आहे. आज रुपयाचे मूल्य 71 डॉलर प्रती डॉलरपर्यंत घसरले..

त्याचबरोबर जागतिक बाजारात पुन्हा क्रुडचे दर वाढले आहेत. अमेरिकाचा तेलसाठा कमी झाला आहे. त्याचबरोबर इराण आणि व्हेनेझुएला येथील तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे क्रुडची मागणी वाढून भाव वाढत आहेत. आता क्रुडचे दर 78 डॉलर प्रति पिंपावर गेले आहेत.

सकाळी गुंतवणूकदार आशावादी होते. त्यामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 38838 अंकापर्यंत वाढला होता. मात्र नंतर सेन्सेक्‍सला ती पातळी राखता आली नाही. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 45 अंकानी म्हणजे 0.12 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 38645 अंकावर बंद झाला. रुपया घसरल्यामुळेच गेल्या दोन सत्रात सेन्सेक्‍स 206 अंकानी कमी झाला होता. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 3 अंकानी वाढून 11680 अंकावर बंद झाला. ससरलेल्या आठवड्यात मात्र सेन्सेक्‍स 393 अंकानी तर निफ्टी 123 अंकानी वाढला. गेल्या सहा आठवड्यापासून निर्देशांक वाढत आहेत.

रुपया घसरत असूनही काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 958 कोटी रुपयाच्या शेअरी खरेदी केली. मात्र, देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1598 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याने आकडेवारी शेअरबाजारानी जाहीर केली. बाजार बंद झाल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्या आधारावर सोमवारी निर्देशांकांची दिशा ठरणार आहे.

येस बॅंकेचा शेअर आज चौथ्या दिवशीही 5.11 टक्‍क्‍यांनी कमी झाला. राणा कपूर बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राहणार असल्याचे बॅंकेने जाहीर केल्यानंतरही शेअरची घसरण सुरूच आहे. उद्या वाहन कंपन्यांच्या विक्रीची आकडेवारी जाहीर होणार आहे. या घडामोडीचा परिणाम सोमवारच्या व्यवहारावर होईल. पडत्या काळातही मुंबई शेअरबाजाराचा स्मॉल कॅप 0.55 टक्‍क्‍यांनी तर मिड कॅप 0.35 टक्‍क्‍यांनी वाढला. त्याचबरोबर आज आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक 2.18 टक्‍क्‍यांनी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 1.38 टक्‍क्‍यांनी वाढला असल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)