शेंद्रे येथील अपघातात एक ठार

सातारा- पुणे-बंगेलोर महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. चंद्रकांत शामराव जाधव असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.बुधवारी रात्री आठच्या सुमारास पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे (ता. सातारा) या गावाच्या हद्दीत दोन कारचा अपघात झाला. हा अपघातात दोन्ही कराचे प्रचंड नुकसान झाले. तर चंद्रकांत शामराव जाधव (रा.निनाम)हे जागीच ठार झाले.

बुधवारी रात्री विनोद नंदकुमार गुरव (रा.शेळकेवाडी,ता.सातारा) हे मारुती बलेनो कारने कराडच्या दिशेने निघाले होते. तर त्याच्यांच पाठीमागून येणाऱ्या चंद्रकांत शामराव जाधव यांच्या कारने शेळके यांच्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात ऐवढा भयान होता की, यामध्ये दोन्ही कारचे नुकसान तर झालेच.पण चंद्रकांत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अपघातामुळे सातारा -पुणे महामार्गावरील चौपदी मार्गाचा एक भाग पूर्णपणे बंद पडला होता. अपघाताची तक्रार सातारा तालुका पोलिस ठाण्यात विनोद गुरव यांनी दिली आहे. पुढील तपास पो.ना. सुजित भोसले करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)