शेंडकरवाडी अंगणवाडीत बालगोपाल पंगत

करंजे – करंजेपूल (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाडी अंगणवाडीमध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्तनपानाचे महत्त्व आणि आरोग्याचा संदेश देण्यात आला व बालगोपाल पंगत घेण्यात आली. स्तनदा मातांना अल्पोपहार देण्यात आला. अंगणवाडी सेविका रेश्‍मा शेंडकर यांनी पोषण आहारासंदर्भात विविध प्रात्यक्षिके सादर केली. त्याचप्रमाणे आरोग्यसेविका एस. एस. वाघमारे, इगतपुरे यांनी स्तनपानाचे महत्त्व व आहाराविषयी माहिती सांगितली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गीतांजली शेंडकर, राणी महानवर, समिधा शेंडकर, कोमल शेंडकर व महिला उपस्थित होत्या. अंगणवाडी मदतनीस मीनाक्षी बडेकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)