शुल्लक कारणावरून शेतकऱ्यांच्या दोन गटांत हाणामारी

वाकी- शेतातून नेण्यात आलेल्या पाइपलाइनच्या वादातून कोयते, लाकडी दांडकी, खोऱ्याने शेतकऱ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार निघोजे (ता. खेड) गावात घडला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील एकूण चार जण जखमी झाले असून, चाकण पोलिसांनी याप्रकरणी रविवारी (दि. 30 सप्टेंबर) परस्पर विरोधी आलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटांतील एकूण सात जणांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
कैलास महादू येळवंडे (वय 50), बायडाबाई कैलास येळवंडे (वय 45), किरण पिराजी पानसरे (वय 48 ) व कैलास पिराजी पानसरे (सर्व रा. निघोजे, ता. खेड) अशी मारहाणीत जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. कैलास येळवंडे यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, शेतातून पाइपलाइन घेण्याच्या कारणावरून कैलास यळवंडे व त्यांच्या पत्नीस किरण पिराजी पानसरे, दर्शन बाळासाहेब पानसरे, अमित बाळासाहेब पानसरे व कैलास पिराजी पानसरे यांनी जबर मारहाण केली. त्यांच्या फिर्यादीवरून या चौघांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर किरण पिराजी पानसरे (वय 48) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, पाइपलाइन शेतातून घेतल्याच्या शुल्लक कारणावरून कैलास महादू येळवंडे (वय 50), बायडाबाई कैलास येळवंडे (वय 45) व त्यांचा मुलगा समीर कैलास येळवंडे यांनी लोखंडी कोयत्याने मारहाण करून किरण पानसरे व कैलास पानसरे यांना गंभीर जखमी केले. त्यानुसार कैलास येळवंडे त्यांची पत्नी व मुलांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)