शुभेच्छा…

आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. नववर्षाची पहिली प्रभात. हा दिवस उगवतो तोच मुळी एक नवीन आशा, नवी उमेद आणि नवा उत्साह घेऊनच. सकाळी सकाळीच मोबाइलची रिंग वाजते. एसएमएस पाठवले जातात. एकमेकांवर शुभेच्छांचे वर्षाव सुरू होतात. नव्या वर्षासाठी शुभचिंतन केले जाते. हॅपी न्यू इयर, विश यू हॅपी ऍन्ड प्रॉस्परस न्यू इयर, नवर्षाचे अभीष्टचिंतन, नया साल मुबारक हो… अशा शब्दांची चौफेर नुसती उधळण चालू होते. ते शब्द ऐकून, कळत नकळत एक वेगळाच आनंद होतो.

भाषा जरी वेगवेगळ्या असल्या, शब्द जरी वेगळे असले, तरी त्या सर्वामागची भावना एकच. सर्वांचे मंगल व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वजण सुखी व्हावेत अशा शब्दांत माणसं एकमेकांचे अभीष्टचिंतन करताना पाहिली, ऐकली की क्षणभर मनात असा विचार येतो की कोण म्हणत माणूस हा स्वार्थी, मतलबी आहे म्हणून. तसं जर असतं तर त्याने हा सर्वांचे कल्याण व्हावे असा विचार तरी केला असता का? बोलून दाखवला असत का? त्याच वेळी दुसरे साक्षी आणि जागृत मन हळूच कानात सांगते. अरे बाबा! नुसतं बोलायला आणि म्हणायला का कुठे पैसे किंवा कष्ट का पडतात? हे असं नव वर्ष सुखाच जावो, असं आपण गेली अनेक वर्षे एकमेकांना म्हणत आलो आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण खरोखरच इतरांच्या जीवनात सुख, आनंद, समाधान हे येण्यासाठी, ते त्यांना देण्यासाठी, आपण प्रत्यक्षात काही करतो का? आणि जर आपण ते करत नसू तर या वरवरच्या कोरड्या बोलण्याला तरी काय आणि किती अर्थ आहे? बोलाची कढी आणि बोलाचा भात त्याने कोणाचे पोट भरणार? आणि कसे? त्यापेक्षा असं कर आज या नव्या वर्षाच्या नव्या मंगल प्रभात क्षणी तूच निश्‍चय कर की, या वर्षात मी नक्कीच दुसऱ्याच भलं व्हावं. त्यांना आनंद वाटावा, सुख समाधान मिळावं, म्हणून नक्‍की काही तरी कृती करणार. त्याचं नव वर्ष सुखी करण्याच्या दृष्टीने मी निदान माझ्या शुभेच्छांना तरी प्रत्यक्ष कृतीची जोड देणार. नववर्षाचा तो नवा विचार माझ्या मनात जागला आणि एक नवी प्रेरणा घेऊन मी एका नव्या संकल्पाने उठलो.

– अरुण गोखले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)