शुभारंभ आपुलकीच्या नात्याचा – प्रशांत दामले

कलर्स मराठी खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम घेऊन आले आहेत, ‘आजकाय स्पेशल’.  एखादा पदार्थ चांगला होण्यासाठी सर्जनशीलता आणि मेहनतीची गरज असते तसेच प्रेक्षकांना आपलसं करण्यासाठी देखील या दोन्ही गोष्टींची सांगड असणे खूप महत्वाचे असते. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला देखील या दोन्हींची उत्तम सांगड असलेले, आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी माणसाशी अतूट नातं जोडलेले तसेच ज्यांना उत्तम चवीची जाण आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रशांत दामले महाराष्ट्रातील खवय्यांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका ‘पर्पलपॅचमिडीयाज’ (प्रशांत नाईक आणि समीर जोशी) निर्मित “आजकाय स्पेशल”तुमच्या लाडक्या प्रशांत दामलेंसोबत.

या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना रुचकर आणि चविष्ट पदार्थ एका नव्या रुपात, नव्या पद्धतीने शिकण्याची वा प्रेक्षकांना दाखविण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमामध्ये विविध प्रांतातील पाककृती एका नव्या अंदाजामध्ये बघायला मिळणार आहे. आपण आजवर अनेक पदार्थ खात आलो पण याच पदार्थांना नवीन पद्धतीने कसे करावे, कशी त्यांची चव वा तो पदार्थ रुचकर करावा, कसे त्यांना खुशखुशीत पद्धतीने सादर करावे हे कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. बाप्पाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावरहा कार्यक्रम सुरु होणार आहे तसेच प्रशांत दामले कलर्स मराठी सोबत आपुलकीच्या नव्या नात्याची सुरुवातया कार्यक्रमाद्वारे करणार आहेत

या मालिकेच्या निमित्ताने कलर्स मराठीप्रमुख, व्हायाकॉम -18 चे निखील साने म्हणाले, रंगमंच, सिनेमा, टेलिव्हिजन या माध्यमांमध्ये सशक्त भूमिका करणारा, एक चांगला मित्र तसेच कलाकार आणि खवय्या म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत दामले यांना आम्ही घेऊन येत आहोत आमच्या आजकाय स्पेशल या नव्या कार्यक्रमामध्ये. मी प्रशांत बरोबर गेली बरीच वर्षे काम करत आहे तो चवीचं खाणारा, हसत हसत आपल्यासोबत जगणं शिकवणारा, एक उत्तम, दर्जेदार कलाकार आहे. प्रशांत कार्यक्रमात असणे म्हणजेच प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी देणे. प्रशांत मधील महत्वाचा गुण, तो खूप निवडक कामं करतो, आणि जी करतो ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतात. प्रशांत दामले घेऊन येत असलेला आमचा हा नवा, फ्रेश, लज्जतदार कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकेल अशी मला खात्री आहे.

या कार्यक्रमाबद्दल प्रशांत दामले म्हणाले, श्वास घेणं जितक महत्वाचं आहे तितकचं महत्वाच खाणं देखील आहे, आयुष्यातील ही एक अविभाज्य गोष्ट आहे असे मी म्हणेन. प्रत्येक माणूस त्या त्या वयाप्रमाणे खात असतो, वेगवेगळ्या पद्धतीच खात असतो तिखट, गोड. वयोपरत्वे त्याच्या खाण्याच्या पद्धती देखील बदलत असतात, पण म्हणून खाण कधीच व्यर्ज होत नाही. कुठल्याही वयात जितक्या पद्धतीच खाता येईल तितका जीवनाचा प्रवास सुखकर होतो. हा जो घटक आहे याश्याचीच संबंधीत हा कार्यक्रम आहे आणि म्हणूनच मी हा कार्यक्रम करत आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)