शुभम बनकर, प्रमोद ठोंबरे दुचाकीचे मानकरी

सोमेश्‍वरनगर येथील ओंकार फॅशन महावस्रदालाचा लकी ड्रॉ उत्साहात

बारामती– सोमेश्‍वरनगर (ता. खेड) येथील ओंकार फॅशन या महावस्त्रदालनाच्या वतीने दिवाळी महोत्सवात आयोजित केलेल्या “लकी ड्रॉ’मध्ये वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील शुभम बनकर तसेच खताळपट्टा (ता. बारामती) येथील प्रमोद ठोंबरे हे भाग्यवान विजेते दुचाकीचे मानकरी ठरले आहेत.
ओंकार फॅशनच्या वतीने गतवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांसाठी दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या खरेदीसाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांनी ओंकार फॅशनमध्ये गर्दी केली होती. ग्राहकांसाठी विषेश ऑफर म्हणून “लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खरेदी कुपनवर आधारीत “लकी ड्रॉ’ची आज (गुरुवारी) मान्यवरांच्या हस्ते व ग्राहकांच्या उपस्थितीत महावस्त्रदालनासमोर सोडत काढण्यात आली. त्यानंतर आज या “लकी ड्रॉ’ची सोडत झाली. यावेळी प्रथम क्रमांकाचे विजेते शुभम बनकर म्हणाले की, शहरात राबवला जाणार हा उपक्रम ओंकार फॅशनच्य माध्यमातून ग्रामीण भागात देखील पोहोचला आहे. बक्षीस योजनेमुळे खरेदीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. पंचक्रोशितील अनेकांना बक्षीसे मिळाली आहेत. व्यवसायाबरोबरच ग्राहकांची विश्‍वासहर्ता जपणयाचा हा चांगला प्रयत्न आहे.
विजेत्यांचे नाव (बक्षीसाचे स्वरुप, गावाचे नाव)
प्रथम (पॅशन प्रो दुचाकी) : शुभम बनकर (वडगाव निंबाळकर), द्वितीय (इलेक्‍ट्रीक स्कूटी) : प्रमोद ठोंबरे (खताळपट्टा). चतुर्थ (एलईडी) प्रणय गायकवाड (करंजेपूल), पाचवे (वॉशिंग मशीन) : राहुल भंडलकर (वाकी), सहावे (स्मार्ट मोबाईल) : सागर घाडगे (मुरुम), सातवे (ओव्हन) : वर्षा बडदे (वडगाव), आठवे (मिक्‍सर) : प्रशांत राऊत (मुरुम), आठवे (फॅन) : भाग्यश्री साळवे, नववे (सायकल) : भाग्यश्री कुरुमकर (इनामगाव).

  • ओंकार फॅशनेने अल्पावधीतच सोमेश्‍वरनगर पंचक्रोशीत नावलौकीक मिळवला आहे. शहरांतील कापड दुकानांच्या धर्तीवर ग्रामीण भागात झालेल्या महावस्त्रदालनाला ग्राहकांनी पसंती दिली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ओंकार फॅशन या महावस्त्रदालनाच्या माध्यमातून एक पर्याय निर्माण झाला आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंतची सर्व कपडे एका छताखाली उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार माफक दरात फॅशनेबल कपडे उपलब्ध करुन दिल्याने ग्राहकांचाही भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. दिवाळी महोत्सव आयोजनामुळे ग्राहकांना देखील नशीब आजमवण्याची संधी मिळाली आहे.
    – दादासाहेब शिंदे, अभिजीत पवार, संचालक ओंकार फॅशन, सोमेश्‍वरनगर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)