शुभतारा वाघोले धामारी ग्रामपंचायत सदस्या पदास अपात्र

  • अप्पर आयुक्‍त पुणे विभाग पुणे यांचे आदेश

शिक्रापूर – धामारी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्या शुभतारा गोपीनाथ वाघोले ह्या ग्रामपंचायत सदस्य या पदास अपात्र असल्याबाबतचे आदेशाद्वारे नुकतेच सुभाष डुंबरे अप्पर आयुक्‍त पुणे विभाग यांनी जाहीर केले आहे. धामारी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक ऑगस्ट 2015 मध्ये पार पडली होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्या म्हणून शुभतारा वाघोले या निवडून आल्या होत्या. परंतु वाघोले यांची 986 चौरस फूट जागा असताना त्यांनी सरकारी जागेत अतिक्रमण करत 1377 फुटाचे बांधकाम केले आहे. त्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट होत असल्याबाबत संपत मल्हारी कापरे यांनी यावर हरकत घेतली. याबाबत न्यायालयात आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. त्यांनतर संपत कापरे यांनी दाखल केलेल्या अर्जास अनुसरून अप्पर आयुक्‍त पुणे विभाग यांनी ग्रामपंचायत सदस्या शुभतारा गोपीनाथ वाघोले ह्या ग्रामपंचायत सदस्य पदास अपात्र असल्याबाबतचे आदेश दिले असल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)