शुद्ध हवेसाठी आता ‘कल्पवृक्ष प्रकल्प’

पालिकेच्या ताब्यातील जागेत बांबूची लागवड होणार : लवकरच ठोस कार्यक्रम

पुणे – शहरातील शुद्ध हवेचे प्रमाण वाढावे या हेतूने, बांबू विकास महामंडळ, पुणे मनपा, नवभारत निर्मिती संकल्प-सिद्दी यांच्या माध्यमातून कल्पवृक्ष हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या काही अॅमिनिटी स्पेसेसवर बांबूची लागवड केली जाणार आहे. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व उद्यानांमध्ये तसेच सर्व मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांच्या परिसरात बांबूची लागवड करण्यात येणार आहे. नवभारत निर्मितीतर्फे नुकतेच महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या सुचनेनुसार याबाबतचा ठोस कार्यक्रम लवकरच सादर केला जाणार आहे.

बैठकीत संस्थेचे समन्वयक योगेश गोगावले, बांबू महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टीएसके रेड्डी, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे, मालमत्ता विभागाचे प्रमुख अनिल मुळे उपस्थित होते.

भाजपचे शहराध्यक्ष गोगावले म्हणाले, शहरातील प्रदूषण पातळी वाढत चालली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पर्यावरण अहवालाची महापालिकेत वार्षिक चर्चा होते. तो सादर केल्यानंतर त्याबाबत उपाययोजना ज्या कार्यक्षमतेने व्हायला पाहिजेत. त्याप्रमाणे होताना दिसत नाहीत. शहरातील दुचाकी, रिक्षा, टेम्पो या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणाऱ्या “पीएमपीएमएल’च्या बसेसची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. श्‍वसन विकार, कर्करोगासारखे गंभीर आजार, मानसिक ताणतणाव वाढले आहेत. अशा परिस्थितीत शहरातील शुध्द हवेचे प्रमाण वाढावे या हेतूने संस्थेतर्फे “कल्पवृक्ष’ हा प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. खासगी मालकीची जमीन, बीडीपीमागील हेतू, शासन निर्णय याचा विचार करता या संकल्पनेतून खासगी मालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, उलटपक्षी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.

बहुआयामी बांबूचे उद्देश लक्षात घेता शहराचे पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, उत्पन्न यामुळे कल्पवृक्ष ही योजना उपयुक्‍त ठरणार आहे. यामध्ये पालिकेला कोणतीही आर्थिक तरतूद करायची नाही. विविध उद्योजकांकडून “सीएसआर’अंतर्गत बांबू लागवडीचा खर्च मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)