शुद्धतेचा वारसा… प्युअर व्हेज खालसा

पंजाबी “खालसा’ या शब्दाचा अर्थच “शुद्ध’ खालसा व्हेज हॉटेलची सुरुवात अजित सिंग चंडोक (पाप्पाजी), गुरुप्रित सिंग चड्डा, रूपिंदर सिंग चड्डा या त्रयींनी 2016 साली पुण्यातील खडकी येथील पहिल्या शाखेपासून केली. कालांतराने खालसाचा शाखा विस्तार विमाननगर, खराडी, बाणेर असा झपाट्याने झाला.

शुद्ध शाकाहार करीत असताना (Pure Veg with the twist of Non Veg) या अनुषंगाने येथील खाद्यपदार्थदेखील जरा हटकेच म्हणावे लागतील. शुद्ध आणि तेवढेच पौष्टिक सोयाबीनपासून बनविलेले राजधानी दिल्लीचे “चाप’ चोखंदळ पुणेकरांसाठी येथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रेशमी चाप, पनीर टिक्का, व्हेज फिश टिक्का, व्हेज लॉलीपॉप, व्हेज बिर्याणी हे पदार्थ खालसाचे वैशिष्ट्ये म्हणता येतील. दिल्लीच्या छोले भटुरे तसेच लच्चा थाळी, कुलचा थाळी यांची मेजवानी काही औरच. खालसामधील खाद्यपदार्थांसाठी वापरले जाणारे पनीर, चाप, मसाले खास चंदीगढ येथून मागविले जातात.

शुद्धता, स्वच्छता आणि पौष्टिकता या गोष्टींचं भान ठेवून खालसामधील पदार्थ तयार केले जातात. नुकत्याच सुरू झालेल्या बाणेर येथील शाखेचे मालक रोहन निकम, राजेश निकम, शिवराज यांनी आवर्जून सांगितले. अल्पावधीतच बाणेर येथील खालसा व्हेजला खवैय्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, दिल्लीच्या चापचा आस्वाद घेण्यासाठी शुद्धतेचा वारसा जोपासणाऱ्या प्युअर व्हेज खालसाला अवश्‍य भेट द्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
6 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)