शुट आउटमध्ये भारतावर बेल्जियमची मात 

निमंत्रितांची चतुरंगी हॉकी स्पर्धा 
हेमिल्टन – भारतीय हॉकी संघाला रविवारी झालेल्या निमंत्रितांच्या चतुरंगी हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात बेल्जियमकडून पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. भारताने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमला निर्धारित वेळेत 4-4 असे बरोबरीत रोखले.मात्र, शूटआऊटमध्ये बेल्जियमने बाजी मारत विजेतेपद जिंकले.

बेल्जियमकडून फॅलिक्‍स डॅनायर, सेबेस्टियन डॉकियर आणि आर्थर वान डॉरेन यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल केले. तत्पर्वी, निर्धारित वेळेत टॅंगुई कोसिनिस (41व्या), सॅड्रिक चार्लियर (43व्या), ऍमुरी केसटर्स (51व्या) आणि फॅलिक्‍स डॅनायरने (56व्या मिनीटाला) गोल केले. तर भारताकडून रमनदीप सिंह (29, 53व्या), नीलकांत शर्मा (42व्या) आणि मनदीप सिंह (49व्या मिनीटाला) यांनी गोल करत सामना बरोबरीत राखला होता. तत्पूर्वी, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यातही जपानने शूटआऊटमध्ये यजमान न्यूझीलंडला 4-1 असे हरवित कांस्य पदक जिंकले. दोन्ही संघानी निर्धारीत वेळेत 1-1 अशी बरोबरी राखली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)