शुजात बुखारी हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांची ओळख पटली

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) – ज्येष्ठ पत्रकार आणि रायजिंग काश्‍मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची पोलीसांना ओळख पटली आहे. 14 जून रोजी श्रीनगरमधील प्रेस कॉलनीत बुखारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बुखारी यांच्या मारेकऱ्यांपैकी दोन जण स्थानिक असून तिसरा पाकिस्तानी नागरिक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आम्हाला मारेकऱ्यांची ओळख पटली आहे, असे तपास करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तिघांपैकी दोन मारेकरी दक्षिण काश्‍मीरमधील दहशतवादी असून तिसरा दहशतवादी पाकिस्तानी नागरिक आहे. नईद जट्ट नावाचा हा पाकिस्तानी दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असून फेब्रुवारी महिन्यात तो श्रीनगरमधील एसएमएचएस (श्री महाराजा हरिसिंह हॉस्पिटल) मधून पोलीसांच्या कस्टडीतून फरार झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुखारी यांना बदनाम करण्याची मोहीम चालवणाऱ्या ब्लॉगरचीही ओळख पटल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. हा ब्लॉगर श्रीनगरमधील एक दहशतवादी असून तो पाकिस्तानात स्थायिक झालेला आहे. 14 जूनच्या हल्ल्यात शुजाअत बुखारी यांच्या बरोबरच त्यांचे दोन बॉडीगार्ड मारले गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)