शीतपेयातून दिले गुंगीचे औषध

पिंपरी – कोल्डड्रींकमध्ये गुंगीचे औषध टाकत 30 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडी येथे घडली आहे.

याप्रकरणी राधेशाम चंद्रकांत गव्हाणे (रा. नवी मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा पीडित महिलेच्या ओळखीचा आहे. त्याने पीडितेला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावले व तिला पिण्यास कोल्डड्रींक दिले. ज्यामध्ये गुंगीचे औषध होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याचा फायदा घेत त्याने तिच्याशी अश्‍लिल वर्तन करत तिच्यासोबत शारिरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच तिचे फोटो काढत ते नवऱ्याला दाखवण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)