शिस्तीचा आग्रह धरणाऱ्याला आज हुकुमशहा म्हटले जाते: पंतप्रधान

उपराष्ट्रपतींच्या पुस्तकाचे प्रकाशन

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांच्या पदाच्या कारकिर्दीला वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने त्यांनी वर्षभराच्या उपराष्ट्रपती पदावरील अनुभवाच्या आधारे एक पुस्तक लिहीले असून या पुस्तकाचे प्रकाशन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की नायडू हे शिस्तीचा आग्रह धरणारे उपराष्ट्रपती आहेत पण आज शिस्तीचा आग्रह धरणाऱ्यावर हुकुमशाही केल्याचा आरोप केला जातो.

ते म्हणाले की नायडू यांनी आपल्यापदाची शान आणि मर्यादा राखताना अत्यंत शिस्तीने काम केले पण आज शिस्तीने काम करणारा लोकशाही विरोधी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचा मानला जातो. नायडू यांनी सुमारे पाच दशके सार्वजनिक जीवनात काम केले आहे त्याती दहा वर्षे त्यांनी विद्यार्थी दशेतील चळवळीत घालवली आणि नंतर चाळीस वर्षे त्यांनी केंद्र आणि राज्याच्या राजकारणात काम केले. या काळात त्यांनी दिलेल्या योगदानाचाही मोदींनी यावेळी गौरव केला. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा इत्यादी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)