शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा अंतिम निकाल कधी?

संग्रहित फोटो

मंचर- इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी अद्याप जाहीर न झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गुणवत्ता यादी त्वरीत जाहीर करावी,अशी मागणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. हा निकाल जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले होते;परंतु जुलै महिना संपला तरीदेखील गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इयत्ता पाचवीतील 1 लाख 9 हजार 225 आणि इयत्ता आठवीतील 45 हजार 397 पात्र विद्यार्थ्यांचे लक्ष गुणवत्ता यादीच्या निकालाकडे लागले आहे, असे सांगून रामभाऊ सातपुते म्हणाले की, इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा राज्य परीक्षा परिषदेने 18 फेब्रुवारी 2018 मध्ये घेतली. या परीक्षेचा निकाल 21 जून 2018 ला जाहीर झाला.इयत्ता पाचवीच्या 4 लाख 72 हजार 884 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 1 लाख 9 हजार 225 विद्यार्थी पात्र ठरले.निकालाची टक्‍केवारी 23.09 आहे.इयत्ता आठवीतील 3 लाख 58 हजार 902 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी 45 हजार 397 विद्यार्थी पात्र ठरले.टक्‍केवारी 12.64 आहे.राज्यात 1 लाख 54 हजार 622 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.परंतु गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यामध्ये संभ्रम आहे.असे सांगुन शिक्षण तज्ञ रामभाऊ सातपुते म्हणाले की शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी विद्यार्थी संख्या कमी होत असून राज्याचा निकाल एकूण फक्त 18.58 टक्‍के आहे. हा निकाल शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी चिंताजनक आहे. 18 फेब्रुवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा गुणवत्ता यादी जाहीर होण्यास साडेचार महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या वाढणे तसेच निकाल वाढणे गरजेचे आहे. शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा इयत्ता पाचवीचा आणि इयत्ता आठवीचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी लवकरात लवकर जाहीर करावी आणि या पात्र विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. या परीक्षेच्या निकालासाठी विलंब होऊ नये, असे निवेदन सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)