शिष्यवृत्ती वेळेत द्या, अन्यथा थेट फौजदारी

पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाचे महाविद्यालयांना आदेश

पुणे – मागील दोन वर्षांत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती रक्‍कम अद्यापही काही संस्थांनी विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली नसल्याचे तक्रारी आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर ज्या संस्थांनी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवली आहे, त्यांनी तातडीने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्‍कम त्यांच्या खात्यावर जमा करावे, असे आदेश पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या योजनेची शिष्यवृत्तीची रक्‍कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होत आहे. मात्र, त्यापूर्वी राज्य शासनाकडून आलेली रक्‍कम महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना दिली जात होती. 2016-17 आणि 2017-18 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती रक्‍कम संस्थांनी अद्याप विद्यार्थ्यांना दिले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केले.

दरम्यान, शिष्यवृत्ती रक्‍कम दिलेली प्रमाणपत्र तंत्रशिक्षण विभागाकडे दि. 15 जानेवारीपर्यंत सादर करणे आवश्‍यक आहे. ज्या संस्था विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेचे वाटप करणार नाहीत, त्या संस्थेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)