शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी संख्येत घट

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या 5 वी व 8 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा विद्यार्थ्यांचे अर्ज गतवर्षीच्या तुलनेत कमी आले आहेत. यंदा 5 वीचे सुमारे 97 हजार तर, 8 वीचे 1 लाख 21 हजार अर्ज कमी आले आहेत. त्यामुळे परिषदेने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-

राज्य परीक्षा परिषदेमार्फत 17 फेब्रुवारी रोजी राज्यभर एकाच वेळी 5 वी व 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. ऑक्‍टोबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीत अनुक्रमे 3 लाख 91 हजार व 2 लाख 48 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. मागील वर्षी अनुक्रमे 4 लाख 88 हजार व 3 लाख 70 हजार अर्ज प्राप्त झाले होते. 8 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांची घट आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्तीचा कोटा केवळ 1 हजार आहे. या वर्षी शिष्यवृत्ती न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तेजनार्थ प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. वाढविलेल्या मुदतीत अर्जांची संख्या लक्षणीय वाढेल, असा विश्‍वास परीक्षा परिषदेकडून व्यक्‍त होत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, विलंब शुल्कासह 15 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)