शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

संग्रहित छायाचित्र

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यामिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा दि. 17 ऐवजी 24 फेब्रुवारी, 2019 रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.

दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात घेण्यासंदर्भात नियोजन केले जाते. यावर्षीदेखील शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 17 फेब्रुवारी 2019 रोजी घेण्यात येणार असल्याचे उपसचिव सुनील अवताडे यांनी कळविले. शिष्यवृत्ती परीक्षा आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यात एकाच दिवशी शक्‍य नसल्याची बाब लक्षात घेऊन इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 17 ऐवजी 24 फेब्रुवारी रोजी घेण्याचा राज्य परीक्षा परिषदेने निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्याबाबत शाळास्तरावर माहिती देण्याविषयी कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत.

दरम्यान इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देण्याची जबाबदारी शाळास्तरावर असणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेची नवी तारीख निश्‍चित झाल्याने वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांना काळजी घ्यावी लागणार आहे. याविषयी प्रचार, प्रसार करण्याबाबत निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)