शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 17 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शाळांना 10 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. याबरोबरच विद्यानिकेतनच्या प्रवेश परीक्षा होणार आहेत. या परीक्षेसाठी 19 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली होती. आता आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 11 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या मुदतीत अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच अतिविशेष विलंब शुल्कासह 1 जानेवारी ते 15 जानेवारी या मुदतीत अर्ज करता येणार आहेत. 15 जानेवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करता येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी सांगितले आहे.

-Ads-

बहुसंख्य विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले नव्हते. या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी शाळांना वाढीव मुदतीची एक संधी देण्यात आलेली आहे. शाळांना प्रपत्राची माहितीही भरावी लागणार आहे. परीक्षेची सविस्तर माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)