शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची मंगळवार पर्यंत मुदत

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज सादर करण्याकरिता मंगळवार(दि. 15) पर्यंतच मुदत देण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 17 फेब्रुवारीला घेण्यात येणार होती. मात्र, या दिवशी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार असल्याने आयोगाने शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबतचे पत्र परीक्षा परिषदेला दिले होते. त्याची दखल घेऊन परीक्षा परिषदेकडून 24 फेब्रुवारी ही तारिख निश्‍चित करण्यात आली आहे. बहुसंख्य शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज भरता यावेत यासाठी अनेकदा मुदतवाढही देण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी शाळांना 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर 1 ते 15 जानेवारी या कालावधीत अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीत शाळांकडून अर्ज दाखल करण्यासाठी उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. यानंतर अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)